भारतीय नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर कोचीमध्ये कोसळले; क्रू मेंबरचा मृत्यू, पायलटची प्रकृती चिंताजनक…

0

 

केरळ, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

केरळमधील कोची येथे भारतीय नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर कोसळले आहे. या अपघातात एका क्रू मेंबरचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर पायलटची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, भारतीय नौदलाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. जेव्हा हा अपघात झाला तेव्हा हेलिकॉप्टरमध्ये दोन जण होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून इतरांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चेतक हेलिकॉप्टर ट्रेनिंगसाठी वापरलं जात होतं, हे हेलिकॉप्टर ट्रेनिंगसाठी निघालं होतं तेव्हा ते कोसळलं. कोची येथील भारतीय नौदलाचे मुख्यालय असलेल्या आयएनएस गरुडाच्या धावपट्टीवर शनिवारी चेतक हेलिकॉप्टरला अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. सध्या केरळ पोलीस आणि लष्कराच्या यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

भारतीय नौदलाने श्रद्धांजली वाहिली

भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार आणि भारतीय नौदलाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी हेलिकॉप्टर अपघातात झालेल्या प्राणहानीबद्दल एलएएम योगेंद्र सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आणि शोक व्यक्त केला. भारतीय नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही एलएएम योगेंद्र सिंग यांना श्रद्धांजली वाहतो ज्यांनी कोची येथे दुर्दैवी अपघातात आपला जीव गमावला आणि त्यांच्या शोकाकुल कुटुंबाप्रती हार्दिक संवेदना व्यक्त करतो.”

पायलटची प्रकृती चिंताजनक

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुपारी 2.30 वाजता धावपट्टीवर टेक ऑफ करताना झालेल्या अपघातात हेलिकॉप्टरच्या रोटर ब्लेडने कापल्यामुळे एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे, तर पायलटची प्रकृती चिंताजनक आहे. ताज्या वृत्तानुसार, जखमींना भारतीय नौदलाच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.