राज्यस्तरीय दुष्काळ निवारण समितीची बैठक लवकरच घेऊन दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय घेणार
मंत्री अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास दिले आश्वासन,निकषात बसणारे सर्कल पात्र ठरणार
अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यस्तरीय दुष्काळ निवारण समितीचा अध्यक्ष राज्याचा मदत व पुनर्वसन मंत्री या नात्याने मीच असून या समितीची बैठक लवकरच घेऊन दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. आणि जे सर्कल निकषात बसतील त्या ठिकाणी 100 टक्के दुष्काळ जाहीर होईल अशी ग्वाही मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास अमळनेर येथे दिली.
तसेच मी अमळनेर मतदारसंघाचा आमदार असलो तरी मंत्री म्हणून संपुर्ण राज्याची जवाबदारी असल्याने जो निर्णय होईल. तो राज्यस्तरासाठी होईल, मात्र विशेष करून जळगाव जिल्हा आणि अमळनेर मतदारसंघावर अन्याय होणार नाही. याची काळजी निश्चितपणे घेतली जाईल. असा खुलासाही मंत्री अनिल पाटील यांनी करीत दुष्काळाची मागणी करताना कुणी राजकीय भांडवल करून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नये, मी स्वतः शेतकरी पुत्र असल्याने शेतकऱ्यांच्या भावना मी जाणून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय कधीच होऊ देणार नाही. असेही त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच दुष्काळ जाहीर करण्यासाठी काही निकष ठरविण्यात आले असून सर्कल निहाय त्याची पाहणी होत आहे.
आतापर्यंत राज्यात 969 सर्कलची दुष्काळासाठी नोंद झाली अजूनही काही सर्कल त्यात ऍड होतील असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. दरम्यान अमळनेर तालुक्यात कमी पर्जन्यमान झाल्याने तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना अमळनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अन्य पक्षाचे पदाधिकारी व शेतकरी बांधवांच्या एका शिष्टमंडळाने मंत्री अनिल पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन दुष्काळ जाहीर करण्याबाबत लेखी निवेदन सादर केले. यात म्हटले आहे की अमळनेर मतदारसंघात पावसाची स्थिती फारच हलाखीची असून त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पाण्याची पातळी देखील कमी झाली आहे. जनावरांसाठी चारा छावणी मंजूर करावी आणि विद्यार्थ्यांची फी माफ करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी सदर शिष्टमंडळात शिवाजी आनंदराव पाटील, श्याम अहिरे, एल टी पाटील, मुक्तार खाटीक, संजय पूनाजी पाटील, रामकृष्ण पाटील, विवेक पाटील, इम्रान खाटीक, योगेश पाटील, विनोद सोनवणे, भूषण पाटील, निलेश देशमुख, भूषण भदाणे, गणेश भामरे, जयदीप पाटील, धर्मराज पाटील, रणजित पाटील, मनोज पाटील, पुंडलिक पाटील, नारायण पाटील, सुभाष सावंत, नरेंद्र पाटील, राहुल भदाणे, आबीद अली सैयद यासह असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.