नवापूर येथे बारा वर्षीय मुलीच्या सतर्कतेने चार दरोडेखोर जेरबंद

0

नवापूर :- नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडीत एका व्यापाऱ्याचा घरात मध्यरात्री दरोड्याचा प्रयत्न झाला. केवळ मुलीच्या सर्तकतेमुळे भरवस्तीत मोठ्या सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न असफल ठरला. या घटनेतील ४ सशस्त्र दरोडेखोरांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे

दरम्यान शेजारच्या खोलीत झोपलेल्या अग्रवाल यांच्या १२ वर्षीय दिशा या मुलीला घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच ती हळूच घरातून बाहेर पडली. लपत जावून तीने जवळच राहणाऱ्या काकांना हा प्रकार सांगितल्यानंतर पोलिस आणि शेजाऱ्यांनी येवून दरोडेखोरांना पकडले.

नवरात्रोत्सवात अग्रवाल यांच्या मुलीने दाखवलेल्या धाडसामुळे नेपाळी दरोडेखोरांचा सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न साफ फसला. विसरवाड़ी गावातील भरवस्तीत कुंभार गल्लीत मुन्ना गणेश अग्रवाल यांच्या घरात २० ऑक्टोंबर रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास पाच सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला. अग्रवाल दाम्पत्य बेडरूममध्ये झोपलेले असताना या पाचही दरोडेखोरांनी घरातील सामानाची नासधूस करत अग्रवाल दांपत्यास मारहाण केली. हाता-पायाला दोरीने व तोंडाला रुमाल बांधून त्यांच्या घरातील कपाट, लॉकर, पलंग व इतर सामान अस्ताव्यस्त केले. भयभीत अग्रवाल : दांपत्याने त्यांच्याकडील सर्व रोखीसह दागदागिने दरोडेखोरांना सुपूर्त केले, तरी देखील दरोडेखोर त्यांना मारहाण करीतच होते.

दरम्यान या घटनेतील दरोडेखोर हे अनेक दिवसांपासून नवापूर परिसरात वास्तव्याला असून हे दरोडेखोर स्थानिक गुन्हेगारांच्या मदतीने परिसरातील सर्व माहिती घेत असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांचे पथक पाहून दरोडेखोरांनी निसचा प्रयत् केला. त्यांच्याकडे कोयता, यमी, मोठे स्कु डायव्हर्ट बिला हे शस्त्र होते. पाय दरोडेखोरांपैकी दोघांना घरात तर दोन आजूबाजूच्या परिसरात दबा धरून बसलेले असताना एकूण चार जणांना ताब्यात घेतले. मात्र, एक घटनास्थळावरून प्रस्तार झाला. या घटनेनंतर नंदुरबार 1. जिल्हा पोलिस अधीक्षक पी आर पाटील यांच्यासह अ अधिकान्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.