भुसावळ येथील एकावर एमपीडीएची कारवाई

0

जळगाव :- – शहरातील गुन्हेगार अजय उर्फ सोनू मोहन अवसरमल (वय २४, रा. भारत नगर, भुसावळ) याच्यावर एमपीडीए कायद्यांअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

शहरातील कायदा व सुव्यवस्थाच्या दृष्टीने, भुसावळ येथे आणखी एका गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई करण्यात आली. अजय उर्फ सोनू याला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबद्ध करण्याचे नुकतेच आदेश दिले आहेत. त्याच्यावर शहरात तसेच समाजात अशांतता पसरवणे याबरोबरच इतर समाजास बाधा निर्माण होईल असे कृत्य करणे असे विविध गुन्हे त्याच्यावर होते. या सर्वांची खात्री पटली असता त्याला मध्यवर्ती कारागृह, मुंबई येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

अजय उर्फ सोनूवर भुसावळ, रेल्वे पोलीस, सावदा, वरणगाव आदी ठिकाणी बेकायदा शस्त्र बाळगणे, चोरी, दरोडा, मारहाण आदिनुसार गुन्हे दाखल आहेत. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सपोनि हरीश भोये व बाजारपेठ स्टेशनच्या सर्व पोलीस टीमने सदरचा प्रस्ताव तयार केला होता. प्रस्ताव एलसीबीकडे सादर केला होता. तेथून अवलोकन झाल्यावर तो जिल्हाधिकारी यांचेकडे पाठविण्यात आला. त्यानुसार दि. १९ रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आदेश पारित केला. त्यानुसार बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड व सहकाऱ्यांनी अजय उर्फ सोनू अवसरमल याला मुंबई येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.