नाशिकमध्ये पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे आघाडीवर

0

नाशिक / लोकशाही न्यूज नेटवर्क

नाशिकमध्ये पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात लढत होत आहे. सध्या या ठिकाणी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील पिछाडीवर आहेत.

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथमच भाजप व महाविकास आघाडी या निवडणुकीत आमने-सामने आले आहेत. त्यामुळे शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या या परीक्षेत कोण बाजी मारणार?, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष आहे. पहिला निकाल कोकणच्या जागेचा लागला असून, येथे भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले असल्याचे मानले जात असून अद्याप याबाबत घोषणा झाली नाही .

नागपूर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले हे प्रारंभापासून आघाडीवर होते. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे बंडखोर अजय भाेयर यांना चांगली मते मिळाली आहेत. अमरावतीमध्ये भाजप आणि मविआत चुरस आहे. धीरज लिंगाडे यांना 11,992 तर, भाजपचे डॉक्टर रणजीत पाटील यांना 11,312 मते मिळाली आहेत .

मराठवाडा शिक्षक मतदार संघासाठी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. विक्रम काळे, सूर्यकांत विश्वासराव आणि किरण पाटील या तिन्ही उमेदवारांमध्ये फार अंतर नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.