नाशिराबादच्या आरोग्य उपकेंद्रातून साहित्यांची चोरी

0

 

जळगाव ;- नशिराबाद च्या प्राथमिक आरोग्याचे उपकेंद्रच्या स्टोअर रूम मधूनविविध साहित्य असा एकुण ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. या ठिकाणी उपकेंद्रातील स्टोअरमध्ये आरोग्य विभागाच्या मालकीचे लोखंडी बेड, फोम गादी, सिलिंग फॅन आणि इतर सामान असा एकूण ५२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे गुरुवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता समोर उघडकीला आले आहे. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. इरेशपाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.