अनकाई किल्ल्याच्या तळ्यात बुडून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

नाशिक:  शिर्डी जवळ असलेल्या पिंपरी लोकाई येथून आलेल्या अशोक कानकुटे या 35 वर्षीय तरुणाचा अनकाई किल्ल्याच्या तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

गावातील कावड यात्रेच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या अंकाई किल्ल्यावर तळ्यामधील पाणी घेण्यासाठी (दि. 3) सकाळी सहा वाजेच्या सुमारास दहा ते पंधरा जणांचा गट आला होता.

यात अशोक कानकुटे हा तरुण पाणी घेण्यासाठी तळ्यात उतरला असता त्याचा पाय घसरून तो पाण्यात बुडाला. पोहता येत नसल्यामुळे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती स्थानिक नागरिक राजू सिंग परदेशी यांनी दिली आहे.

नाशिक : 35 एकरांवर साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण

गावातील ग्रामस्थ व पोलीस पाटील यांच्या मदतीने तरुणाचा मृतदेह वर काढण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास येवला तालुका पोलिस करत आहे. दरम्यान या तळ्यामध्ये यापूर्वी अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.