नाशिकचा तिढा मिटणार, शिंदेसेनेला जागा सुटणार?

अजय बोरस्तेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट : छगन भुजबळही आहेत स्पर्धेत

0

नाशिक ;- नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीकडून कोणाला मिळणार यावरून उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. विद्यमान खासदार गोडसेंच्या नावाला विरोध झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. मात्र नाशिक लोकसभेची जागा शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेला जाणार आणि धनुष्यबाण चिन्हावर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवली गेली. मात्र गोडसेंच्या नावानंतर जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या नावाची चाचपणी महायुतीकडून करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेलेले अजय बोरस्ते यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कोणाला मिळणार? अशा सर्व चर्चांवर मुख्यमंत्री शिंदेंसोबत काय बोलणे झाले याबाबत अजय बोरस्ते यांनी सांगितले आहे.
नाशिक लोकसभेसाठी इच्छुक असलेले शिंदेंचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेला जागा सुटणार आणि धनुष्यबाणावर उमेदवार निवडणूक लढवत जिंकणार, असा विश्वास बोरस्ते यांनी व्यक्त केला. लवकरच नाशिक लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात येईल, असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याचे अजय बोरस्त यांनी म्हटले. नाशिकची जागा शिवसेनेला मिळेल यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आग्रही आहेत. महायुतीच्या सर्व नेत्यांसोबत चर्चा करून लवकरच उमेदवार जाहीर करण्यात येईल अशी माहिती देखील अजय बोरस्ते यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिली.
मात्र, शिंदे यांच्या शिवसेनेला नाशिक लोकसभेची जागा सुटेल तर उमेदवार कोण असणार यावर अजय बोरस्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो कोणी उमेदवार देतील त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व एकत्र प्रयत्न करू आणि निवडणुकीत महायुतीचा उमेदवार निवडून येईल अशी भूमिका बोरस्त यांनी मांडली.

गुंता अधिक वाढला
उमेदवार निश्चितीवरून महायुतीत रस्सीखेच कायम असल्याचा पाहायला मिळत आहे. नाशिकच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली असताना, भाजपने देखील आपला हक्क सोडलेला नाही. दुसरीकडे, शिवसेनेच्या शिंदे गटात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. या मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी अनेकवेळा ठाणे- मुंबईवारी करत मुख्यमंत्र्यांसमोर दावेदारी केली असताना, आता या उमेदवारीसाठी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचेही नाव पुढे आले आणि त्यामुळे नाशिकच्या जागेचा गुंता अधिकच वाढला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.