वन विभागाच्या पथकावर वाहन घालण्याचा प्रयत्न ; खैराचे लाकूड तस्करीचा प्रयत्न

0

नाशिक : खैराची अवैध वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनासह खैराचे ३६ नग लाकूड पश्चिम वनविभागाच्या पथकाने वनपरिक्षेत्र हरसूल (ता. त्र्यंबकेश्वर) येथे जप्त केले आहे. कर्मचारी पथकाने वाहन अडविण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने पथकावरच वाहन घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहन रस्त्यालगतच्या चारीत गेले. अंधाराचा फायदा घेत वाहनचालक व इतर संशयित फरार झाले.
उपवनसंरक्षक, पश्चिम भाग नाशिक पंकज गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, हरसूल (प्रा.) यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात मंगळवारी

घनमीटर रक्कम सहा हजार ४०० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खैराची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ व महाराष्ट्र वन नियमावली २०१४ च्या कलमान्वये राउंड गुन्हा नोंदविण्यात आला असून, आडगाव वनपाल यासंदर्भात तपास करीत आहेत.
(दि. ६) मध्यरात्री आपल्या स्टाफसह सापळा रचून आडगाव ते टोकपाडा रस्त्यालगत संशयित आयशर (एमचएच ०४ डीएस ५७००) मुद्देमालासह ताब्यात घेत कार्यवाही केली आहे, अशी माहिती पंकज गर्ग यांनी दिली. वाहन ताब्यात घेऊन हरसूल वनपरिक्षेत्र कार्यालयात आणून त्याची तपासणी करण्यात आली. वाहनाची अंदाजे किंमत तीन लाख इतकी असून, वाहनातील ३६ नग खैर ०.६०७ हरसूल वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास सोनवणे, वनपाल अमित साळवे, सुनील टोंगारे, पद्माकर नाईक, वनरक्षक गजानन कळंबे, मनोहर भोये व वाहनचालक संजय भगरे यांनी ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली असल्याचे पंकज गर्ग यांनी संगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.