अपहरण, लैंगिक शोषणप्रकरणी एकास तीन वर्षे कारावास

0

निफाड : आजीकडे पोहोचून देतो, असे सांगून अकरा वर्षे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून वाटेत लैंगिक शोषण केल्याप्रकरणी संशयितास न्यायालयाने दोषी ठरवले आहे. भाऊसाहेब सुरेश महाले (रा. रेनखेडे, न्यायडोंगरी, ता. नांदगाव) असे आरोपीचे नाव असून त्यास तीन वर्षे कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. व्ही. गुजराथी यांनी ठोठावली आहे.

तामसवाडी (ता. निफाड) येथे डिसेंबर २०२० मध्ये हा प्रकार घडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ डिसेंबर २०२० रोजी निफाड येथून आजीकडे पोहोचून देतो, असे सांगून अकरा वर्षे अल्पवयीन मुलीला भाऊसाहेब महाले याने दुचाकीवर बसवून नेले. वाटेत काटवणाजवळ तिचे लैंगिक शोषण करण्याच्या उद्देशाने आड बाजूला नेताना नागरिकांनी त्यास पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. तपास करून निफाड पोलिसांनी भाऊसाहेब महाले याच्या विरोधात निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून आरोपपत्र दाखल केले. खटल्यात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सहायक जिल्हा सरकारी अभियोक्त आर. एल. कापसे यांनी आठ साक्षीदार तपासले. न्या. ए. व्ही. गुजराथी यांनी आरोपीला दोषी ठरवत तीन वर्षे कारावास पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.