नाशिकमध्ये ३ लाख ७८ हजारांचा नायलॉन मांजा जप्त

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

विक्री करणाऱ्यांवर आणि वापरकर्त्यांची गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने नुकतेच दिलेत. त्यानुसार नायलॉन मांजाचा वापर रोखण्यासाठी नाशिक पोलिसांनी २१ भरारी पथकांची नियुक्ती केली. या पथकाने गत २० दिवसांत १४ गुन्हे दाखल करीत १८ विक्रेत्यांना अटक केली. तसेच ४१ जणांवर तडीपारीची कारवाई केल्याची माहिती दिली.

नायलॉन मांजामुळे मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत आणि घडत आहे. त्यामुळे या मांज्यावर काही ठिकाणी बंदी आणली गेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने देखील नायलॉन माजांचा वारकर्त्यांवर गुन्हा दाखल करून विक्रेत्यांचे दुकान तसेच घर सील करण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यात नायलाॅन मांजा वापरणा-यांवर देखील जरब बसल्याचे दिसून आले.

नायलॉन मांजामुळे पक्षांसह नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण होत असल्यानं नाशिक पोलिसांकडून कडक पावलं उचलली गेली आहे. नायलॉन मांजाचा वापर रोखण्यासाठी पोलिसांची २१ भरारी पथकांची नेमणुक करण्यात आली आहे.

नायलॉन मांजा विक्री आणि वापर प्रकरणी मागील २० दिवसांत १४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच १८ विक्रेत्यांना अटक करण्यात आली असून, ४१ जणांवर तडीपारीची कारवाई केल्याची माहिती पोलीस दलाने दिली. पाेलिस दलाने एक्स वर सुमारे तीन लाख 78 हजार रुपयांचा बंदी असलेला नायलाॅन माजा जप्त केल्याची माहिती विषद केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.