एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

वावडदा येथे दिनांक १३ जानेवारी २०२४ शनिवार रोजी एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक पूर्ती निमित्त या संकल्पनेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खलील शेख गटशिक्षणाधिकारी पं. स. जळगाव, विजय पवार शापोआ प्रमुख. संस्थेचे अध्यक्ष दादासो एल. एच. पाटील, जितेंद्र पाटील, उपाध्यक्ष वीरेंद्र पाटील, वैशाली पाटील, आर. डी. पाटील, अर्चना पाटील, कुणाल राजपूत, दिव्यांनी राजपूत, सुषमा कंची, सोना कुमार, वैशाली पंडित, शिल्पा मलारा, मधुकर पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन आणि आरतीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर नंतर दीपप्रज्वलन आणि स्वागत गीताने कार्यक्रमाच्या प्रस्तावने प्रमाणे सुरुवात करण्यात आली तर नंतर आलेल्या सर्व प्रमुख पाहुणे मान्यवरांचे पुष्पगुच्छ मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मागील शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी मधील प्रथम, ivdtIya आणि तृतीय विद्यार्थ्यांना मानचिन्ह व रोख रकमेचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

सदर सोहळ्यासाठी जवळपास ५५० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दिलेला होता. सहभागी विद्यार्थी जिजामाता, महाराज, अष्टप्रधान मंडळ, सारथी, सेनापती, मावळे, मुघल यांचे वेशभूषेतील व रंगमंचावर सादर केलेल्या नाटिका व नृत्याने सर्व प्रेक्षक भारावून गेले होते. बाजीप्रभूंच्या वीरगती क्षणाला अक्षरशा प्रेक्षकांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. शाळेचे संगीत शिक्षक कुशराजे पवार यांच्या बँड व संगीत पथकाने मान्यवरांचे आगमन, स्वागत गीत तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आगमनाचे ढोल ताशांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक प्रदीप वाघ आणि विद्यार्थी आदित्य पाटील, वैष्णवी पाटील, गायत्री पाटील, उदय पाटील, लोकेश पवळ, संदेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या प्राचार्य जयश्री पाटील यांनी मानले. सदर राज्याभिषेक सोहळ्याकरिता संस्थेचे अध्यक्ष दादासो एल. एच. पाटील, जितेंद्र पाटील, वीरेंद्र पाटील, शाळेच्या प्राचार्य जयश्री पाटील, सुजीता साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले व समन्वयक अन्वेषा माहेश्वरी, रत्ना महाजन शाळेच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सोहळा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.