संतापजनक; यावल येथे पोटच्या मुलाने कुऱ्हाडीने केली बापाची निर्घृण हत्या

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

माझे लग्न करून द्या अशी मागणी करत करत असलेल्या वृद्ध वडिलांना स्वतःच्या मुलाने रंगात येउन कुऱ्हाडीने वार करत हत्या किल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावल तालुक्यात ही घटना घडली असून, पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्न तानसिंग कोळी (वय-७३ रा. पिळोदा ता. यावल) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यावल तालुक्यातील पिळोदा येथे रतन कोळी व त्याची पत्नी शुबाबाई कोळी आणि मुलगा देवानंद कोळी यांच्यासोबत वास्तव्यास होते. नेहमीप्रमाणे रविवारी १४ जानेवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास झोपलेले असतांना, मुलगा देवानंद कोळी याने माझे लग्न लावून द्या म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. वडिलांनी याकडे दुर्लक्ष केले असता, याचा राग डोक्यात घालत आरोपीने झोपलेल्या वृद्ध पित्यावर कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या केली.

या घटनेने गावात खळबळ उडाली. यावेळी पतीचा खून झालेला पांगून पत्नी शुबाबाई यांनी एकाच आक्रोश केला. पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आरोपी देवानंद कोळी याला अटक करण्यात आली.

रतन कोळी यांचे यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी शबाबाई कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मुलगा देवानंद कोळी याच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिळोदा गावात घटनास्थळी फैजपुरच्या डीवायएसपी अन्नपुर्णा सिंह यांच्यासह पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर व यावल पोलीस पथकाने भेट दिली, पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.