गुटखा माफिया राज भाटियाचा नाशिकमधील हस्तक तुषार जगतापला अटक !

0

 

नाशिक ;-कुख्यात गुटखा माफिया राज भाटियाचा नाशिकमधील हस्तक तुषार जगतापला नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
दिनांक २६ रोजी इगतपुरी पोलीस ठाण्यातील पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर मुंबईच्या बाजूने जाणारे गुटख्याने भरलेले दोन कंटेनर पकडून सुमारे सव्वा कोटींचा अवैध गुटखा जप्त केला होता. या गुन्ह्यात मुख्य आरोपी राज किशनकुमार भाटिया (वय ३८, रा. जयपूर, राजस्थान) याला २३ जून २०२३ रोजी जयपूर येथून अटक करण्यात आली होती. आरोपी राज भाटिया हा दिल्ली व जयपूर येथून सूत्रे हलवून बंद कंटेनरमध्ये गुटखा लपवून देशातील विविध राज्यांमध्ये गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी करत होता.दरम्यान आरोग्यदूत’समजला जाणारा तुषार जगताप याला नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. महिनाभरापूर्वी इगतपुरीत सव्वा कोटी रुपयांचा गुटखा हस्तगत केल्याच्या गुन्ह्यातील तपासात जगतापचे ‘नेटवर्क’ उघड झाले आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा अभिलेखावरील गुटखा तस्करीच्या दाखल गुन्ह्यांमध्ये मागील २ ते ३ वर्षांपासून आरोपी राज भाटिया हा फरार होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी राज भाटिया याने कबुली दिली की, तो सन २०२१ पासून नाशिक येथील तुषार जगताप याच्या संपर्कात होता. आणि त्याच्याच मदतीने तो महाराष्ट्रातील अवैध गुटख्याचे नेटवर्क चालवत होता. यावरून इगतपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपी तुषार कैलास जगताप, (वय: ३६, रा. त्रिमूर्ती नगर, नाशिक) याला अटक करण्यात आली आहे.

आरोपी तुषार जगताप हा त्याच्या गुटखा तस्करीमधील परराज्यातील साथीदारांसह नेटवर्क चालवून नाशिक जिल्ह्याचत गुटख्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी करत होता. जिल्ह्यातील अवैध गुटखा नेटवर्कचे समूळ नष्ट करण्यासाठी ग्रामीण पोलिसांची पथके कारवाई करत आहेत. राज भाटिया याचा नाशिक शहरातील हस्तक तुषार जगताप याच्या अटकेमुळे गुटखा तस्करीची राज्यातील पाळेमुळे खुडण्यास पोलिसांना मदत होणार आहे. या गुन्ह्याचा तपस इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राजू सुर्वे करत आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.