Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ED कडून अटक
    राष्ट्रीय

    जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ED कडून अटक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 2, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

     

    मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अटक करण्यात आली आहे. कॅनराला बॅकेकडून घेण्यात आलेल्या ५३८ कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी ईडीने त्यांची चौकशी केली होती. या चौकशीनंतर गोयल यांना अटक करण्यात आली होती. हे प्रकरण ५३८ कोटी रुपयांच्या कॅनरा बँकेतील घोटाळ्याशी संबंधित आहे. या प्रकरणी ईडीने कारवाई केली आणि जेट एअरवेजचे संस्थापक गोयल यांना अटक केली. उद्या शनिवारी गोयल यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

    मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गोयल यांची ईडीने अनेक तास चौकशी केली होती. ईडीने कॅनरा बँकेच्या तक्रारीनंतर गोयल, अनीता गोयल, आनंद शेट्टी आणि जेट एअरवेज इंडिया लिमिटेडविरुद्ध ५३८ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी जुलै २०२३ मध्ये गोयल आणि जेट एअरवेजच्या अनेक ठिकाणांवर छापे देखील टाकण्यात आले होते.

    काय आहे प्रकरण

    बंद पडलेल्या जेट एअरवेजचे नरेश गोयल हे प्रमोटर होते. गोयल यांच्यासह काही जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात मुंबई आणि दिल्लीत ८ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. ५३८ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यात आता त्यांच्या अडचणी अजून वाढत चालल्या आहेत. ईडीने गोयल, त्यांची पत्नी अनीता तसेच जेटचे डायरेक्टर गौरंग आनंद शेट्टी यांना आरोपी करण्यात आले होते. ईडने कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून नवा गुन्हा दाखल केला. त्याआधी फेब्रुवारी महिन्यात बॉम्बे उच्च न्यायालयाने गोयल आणि पत्नी यांना मोठा दिलासा दिला होता. तेव्हा कोर्टाने मनी लॉन्ड्रिंगचा खटला रद्द केला होता. पण कोर्टाने असे देखील म्हटले होते की जर नवा खटला समोर आला तर ईडी चौकशी करू शकते.

    आता चौकशी झाल्यानंतर गोयल यांना अटक झाली. ईडीने दिलेल्या माहितीनुसार एक एप्रिल २०११ ते ३० जून २०१९ दरम्यान प्रोफेशनल आणि कंसल्टेन्सी खर्च म्हणून ११५३.६२ कोटी खर्च केले. जेटशी संबंधित कंपन्यांचा १९७.५७ कोटीच्या व्यवहाराची चौकशी सुरू आहे. चौकशीत असे समोर आली की ११५२.६२ कोटी पैकी ४२०.४३ कोटी अशा कंपन्यांना दिले ज्यांचा सेवा देण्याशी काही संबंध नव्हता.

     

    ED Naresh Goyal Naresh Goyal Arrested New Delhi
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक

    August 11, 2026

    पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif