अंबड तालुक्यात पोलिसांनी केला लाठीचार्ज, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अंबड तालुक्यातील अंतरावली सराटी येथील आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रूधुरा नळकांड्या आणि प्लास्टिक बुटेचा मारा केला. जालना शहरात अंबड चौफुलीवर शनिवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन अरण्यात आले. त्रवली सराटी येथे शुक्रवारी मराठी आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज आणि प्लास्टिक बुटेचा मारा केला होता. तर ग्रामस्थांनी दगड फेक केली.

दगडफेकीत 45 पोलिस अधिकारी, कर्मचारी, 50 पेक्षा जास्त ग्रामस्थ जखमी झाले आहेत. पोलिसांच्याया कारवाईमुळे जिल्ह्यासह राज्यात पडसाद उमटले आहेत. या निषेधार्थ शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत वीस बस आणि काही खाजगी वाहने जाळण्यात आले असून, शनिवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जालना बंदची हाक देण्यात आली आहे. याला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली तर, अंबड चौफुली परिसरामध्ये सकल मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे जालना-अंबड, जालना-नांदेड मार्ग ठप्प झाला होत. आंदोलन स्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.