Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»गर्भवतीची सासरच्या लोकांनी नग्न धिंड काढली, व्हिडीओ व्हायरल
    गुन्हे वार्ता

    गर्भवतीची सासरच्या लोकांनी नग्न धिंड काढली, व्हिडीओ व्हायरल

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 2, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    महिलांची सुरक्षा वेशीवर टांगली आहे. रोज महिला अत्याचाराच्या घटना घडत असतात. राजस्थानमध्ये एका गर्भवती महिलेला विवस्त्र करून रस्त्यावर धिंड काढल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पतीनेच पत्नीला विवस्त्र करून गावातील रस्त्यावरून फिरवले आहे.  त्यावेळी ही महिला मदतीसाठी आर्त हाक देत होती. मात्र कोणीही तिच्या मदतीसाठी समोर आले नाही. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 6 आरोपींना अटक करण्यासाठी 6 पथके तयार केली आहेत.

    राजस्थान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या महिलेचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध आहेत असा संशय तिच्या पतीला आणि तिच्या सासरच्यांना होता. याच संशयावरुन तिची धिंड काढण्यात आली. ही महिला गर्भवती आहे’. विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरुन तिच्या पतीने आणि तिच्या सासरच्यांनी तिची नग्न धिंड काढली. ही महिला लग्नानंतरही दुसऱ्या पुरुषाबरोबर राहत होती. त्याच गोष्टीचा राग मनात ठेवून तिला त्या घरातून पळवून गावात आणण्यात आले. तिच्या पतीने आणि तिच्या सासरच्या मंडळींनी तिला मारहाण करुन तिला विवस्त्र केले आणि त्यानंतर तिची धिंड काढली धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    व्हायरल व्हिडिओमध्ये महिला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असून ती किंचाळत आहे. मात्र गावकरी बघ्याची भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. नवरा महिलेचे कपडे फाडतोय, गावकऱ्यांसमोर स्वतःच्या पत्नीला विवस्त्र करतोय. मात्र महिलेला वाचवण्यासाठी गावातील कोणीही पुढे आले नाहीत. तर  गावकरी या घटनेचा व्हिडिओ बनवत असल्याचे पाहायला मिळाले.

    प्रतापगढ़ जिले में पीहर और ससुराल पक्ष के आपसी पारिवारिक विवाद में ससुराल पक्ष के लोगों द्वारा एक महिला को निर्वस्त्र करने का एक वीडियो सामने आया है।

    पुलिस महानिदेशक को एडीजी क्राइम को मौके पर भेजने एवं इस मामले में कड़ी से कड़ी कार्रवाई के निर्देश दिए हैं।

    सभ्य समाज में इस…

    — Ashok Gehlot (@ashokgehlot51) September 1, 2023

     

    एसीपी अमित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेसाठी सहा पथके तयार करण्यात आले आहेत. एसीपी अमित कुमार यांनी गावात तळ ठोकला आहे. दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री अशोक गेहेलोत यांनी ट्विट केले आहे. प्रतापगड जिल्ह्यात एका वादावरून महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी विवस्त्र केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सुसंस्कृत समाजात अशा गुन्हेगारांना स्थान नाही. फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवण्यात येणार असून लवकरात लवकर शिक्षा होईल असे यावेळी ट्विटमध्ये म्हटले आहे.

     

     

    crime news Rajsthan Woman Naked Parade
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक

    August 11, 2026

    पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif