जागतिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत नरेंद्र मोदी

0

नवी दिल्ली / लोकशाही न्यूज नेटवर्क

जागतिक नेत्यांच्या लोकप्रिय नेत्यांची यादी जाहीर झाली असून यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ७८ टक्के मिळवून प्रथम क्रमांकावर विराजमान झाले आहेत.

मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणानुसार, PM मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह 16 देशांच्या दिग्गज नेत्यांना मागे टाकले आहे. पंतप्रधान मोदींना जगभरातील नेत्यांमध्ये सर्वोच्च रेटिंग मिळाली आहे.

या यादीत मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर () दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 68 टक्के रेटिंग मिळाली आहे. तर, तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे पीएम अल्बानीज आहेत, ज्यांचे रेटिंग 58 टक्के आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी चौथ्या क्रमांकावर आहेत. मेलोनी याचे रेटिंग 52 टक्के आहे.

याशिवाय, भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक या यादीत 10 व्या स्थानावर आहेत. जागतिक नेत्यांमध्ये त्यांचे रेटिंग 30 टक्के आहे. सर्वेक्षणानुसार, 2021 नंतर पीएम मोदींची लोकप्रियता आणखी वाढली आहे. त्यामुळे ते अव्वल स्थानावर विराजमान झाले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.