गोंडगावच्या कलावंतांनी प्रजासत्ताक दिनी केली कला सादर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील लोककलावंत भिका भराडी व समाधान भराडी या लोककलावंतांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी मुंबई संचालनालयासमोर आपली अप्रतीम कला सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

, २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई शिवाजी पार्क येथे सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन मुंबई ३२ चे संचालक बीभीषण चौरे यांचे मार्गदर्शनाखाली खान्देशातील दलवाडे. गोंडगाव ता भडगाव जि जळगाव येथील लोक कलावंत भिका काशीनाथ भराडी, चि समाधान भिका भराडी यांनी आपली कला सादर केली.

राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत या गीतांची धुन पारंपारिक किंगरी व दिमडी या वादयाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोशारी यांचे समोर २ मिनीटे किंगरी वाजवुन दाखवली. त्यांनी आपल्या कलेने उपस्थितांची मने जिंकली. या कलाकारांचे सर्वत्र परिसरात कौतुक केले जात आहे. खानदेशातील लोककला ,लोक वाद्य राज्य स्तरावर नेउन सादर केले. याबद्दल गोंडगाव गावातील ग्रामस्थ मंडळींनी त्यांचा सन्मान केला आहे. त्यांच्या कार्यास शुभेच्छाही दिल्या आहेत. हे लोककलावंत भडगाव तालुक्यात आपल्या कलेचे नेहमी दर्शन देतात.

Leave A Reply

Your email address will not be published.