अदानी समूहाच्या मुद्द्यावरून संसदेत गोंधळ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अदानी समूहावरील हिंडेनबर्गच्या अहवालामुळे संसदेपासून बाजारापर्यंत हल्लकल्लोळ माजला आहे. विरोधकांनी अदानी समूहावरील आरोपांची सखोल चौकशीची मागणी केली आहे. या मुद्यावरून शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी संसदेत गदारोळ झाला. त्यामुळे संसदेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले . विरोधकांनी अदानींच्या कथित घोटाळ्याची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) किंवा सुप्रीम कोर्टाच्या नेतृत्वातील समितीमार्फत करण्याची मागणी केली आहे.

दुसरीकडे, US स्टॉक एक्सचेंज डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून अदानी एंटरप्रायझेसला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे वृत्त येताच शुक्रवारी सकाळी कंपनीचे शेअर्स 35 टक्क्यांपर्यंत कोसळले. पण दुपारी 12.30 पर्यंत शेअर्स रिकव्हर होऊन ही घसरण केवळ 11 टक्के राहिली. आता दुपारी 2.45 पर्यंत शेअर्समध्ये आणखी सुधारणा झाली आहे. आता केवळ 1 टक्क्यांची घसरण शिल्लक राहिली आहे. एका शेअरची किंमत 1550 रुपयांवर पोहोचली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.