Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»पंतप्रधानांनी सायंकाळी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक
    ताज्या बातम्या

    पंतप्रधानांनी सायंकाळी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 18, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली ;- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. मोदी सरकारने १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर पर्यंत विशेष अधिवेशन बोलावले आहे.

    यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आजपासून सुरू होणारे संसदेचे अधिवेशन लहान असले तरी वेळेच्या दृष्टीने ते ‘खूप मोठे’, ‘मौल्यवान’ आणि ‘ऐतिहासिक निर्णयांनी’ भरलेले आहे. या अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे ७५ वर्षांचा प्रवास आता एका नव्या ठिकाणाहून सुरू होत आहे.

    ‘चंद्रयान-3 आणि G20 च्या यशस्वीप्रक्षेपणानंतर हे सत्र सुरू होत आहे, त्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढते. G20 मध्ये ग्लोबल साउथचा आवाज असल्याचा भारताला नेहमीच अभिमान वाटेल. आफ्रिकन युनियनचे स्थायी सदस्यत्व आणि G20 ची एकमताने घोषणा, या सर्व गोष्टी भारताच्या उज्ज्वल भविष्याचे संकेत देतात. मंगळवारी, गणेश चतुर्थीच्या दिवशी नवीन संसदेच्या कामकाजाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, नवीन स्थानापर्यंतचा प्रवास पुढे नेत असताना आपल्याला नवीन दृढनिश्चय, नवीन ऊर्जा आणि नवीन विश्वासाने काम करावे लागेल.

    पीएम मोदी म्हणाले, २०४७ पर्यंत देशाचा विकास करायचा आहे. यासाठी जे निर्णय घेतले जाणार आहेत ते सर्व या नवीन संसद भवनात घेतले जातील. नव्या सभागृहात आपण उत्साहाने आणि आत्मविश्वासाने प्रवेश कर. हे अधिवेशन अत्यंत मोलाचे असल्याचेही मोदी म्हणाले.

    संसदेत विविध पक्षांनी केलेल्या गदारोळावर मोदी म्हणाले, “रडायला खूप वेळ आहे, करत राहा, पण आयुष्यात काही क्षण असे असतात जे तुम्हाला उत्साहाने भरून टाकतात. विश्वासाने भरून जातात.” अशा प्रकारे मी या सत्राकडे पाहतो, असंही मोदी म्हणाले.

    dilli Narendra Modi
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी

    August 12, 2026

    वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!

    August 12, 2026

    आम्हाला शाहांचे भाषण ऐकण्यात काहीच स्वारस्य नाही

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif