पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सूर्य घर योजनेची घोषणा

0

नवी दिल्ली-सौरऊर्जेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  मंगळवारी घोषणा केली . सरकार ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ सुरू करत आहे. 300 युनिटपर्यंत मोफत वीज देऊन एक कोटी घरांना वीज देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधानांनी सोशल मीडिया ‘एक्स’वरील पोस्टमध्ये ही घोषणा केली. ते म्हणाले, “शाश्वत विकास आणि लोकांच्या कल्याणासाठी आम्ही पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू करत आहोत. या प्रकल्पात 75,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होणार असल्याचे मोदींनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज देणार असून 1 कोटी घरांना याचा लाभ मिळणार आहे, असेही ते म्हणाले.

मोदी म्हणाले की, योजना तळागाळात लोकप्रिय करण्यासाठी, शहरी स्थानिक संस्था आणि पंचायतींना त्यांच्या अधिकारक्षेत्रात रूफटॉप सोलर सिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.