जिल्हास्तरीय स्पर्धेत २३ कल्पनांची निवड

0

जळगाव ;– महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीने आयोजित केलेल्या “महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेज २०२३” अंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेत २३ कल्पनांची निवड झाल्याबद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि के. सी. आय. आय. एल तर्फे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेतंर्गत संपूर्ण महाराष्ट्रातुन ३६ जिल्ह्यास्तरावर २८५ कल्पनांची निवड करण्यात आली. या प्रत्येक कल्पनेस महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीकडून १ लाखाचे बीज भांडवल पुरविण्यात येणार आहे. या २८५ कल्पनांतंर्गत खान्देशातील २३ कल्पनांची निवड झाली. निवड झालेल्या सर्व कल्पना विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालय व विभागातील विद्यार्थ्यांच्या आहेत.

या सर्व विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल विद्यापीठ आणि के. सी. आय. आय. एल (इन्क्युबेशन केंद्र) तर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात के. सी. आय. आय. एल. तर्फे कल्पना स्टार्टअप महाराष्ट्र स्तरावर नेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून “बीज भांडवलाच्या निधीच्या वापरासाठी मानक कार्यप्रणाली” या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.

प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. समीर पाटील यांनी केले. कार्यक्रमाची रुपरेषा संचालक डॉ. राजेश जवळेकर यांनी मांडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे होते. प्रास्ताविक श्री. सागर पाटील यांनी केले. सदर कल्पना या इंजिनिरींग १०, इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी ३, कृषी ४, आरोग्य ५ आणि ऊर्जा या क्षेत्रांशी संबधित होत्या.

कार्यशाळेत व्यवस्थापक डॉ. समीर पाटील व सागर पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच कार्यशाळेची सांगता संचालक डॉ. विकास गीते यांच्या उपस्थितीत झाली. या कार्यशाळेत प्रा. संदीप पाटील (के. सी. ई. जळगाव), डॉ. सुनील न्याती (के. सी. ई. (सी. ओ. ई. एम, जळगाव), डॉ. एजाज अहमद (फार्मसी महाविद्यालय, अक्कलकुवा) हे उपस्थित होते. श्री. दर्पण साळुंखे यांनी आभार मानले. केसीआयआयएल तर्फे श्री. देवेंद्र काळे व श्री. योगेश पाटील तसेच विशाल पाटील यांनी यशस्वीतेसाठी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.