अवकाळी पावसाने नंदुरबारमध्ये भात पिकाचे नुकसान

0

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्ह्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा सर्वात मोठं फटका शेतकऱ्यांना बसला आहे. काढणीसाठी आलेला कापूस, भात आणि केळी पिकाला अवकाळी पिकाला अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याचा फटका बसला आहे. यात काढणीला आलेल्या भात पिकाच्या शेतात सर्वत्र पाणी साचले होते. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या ऑरेंज अलर्टनंतर नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरु असून, त्याचा फटका आता शेतकऱ्यांना बसत आहेत. रब्बी हंगामातील पिकांचे मोठं नुकसान झालं असून नवापूर तालुक्यातील देवलीपाडा परिसरात भात शेतीत पाणी गेल्याने भात शेतीच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या भात शेतीत पाणी गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, सरकारने पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई द्यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.

अजून ३ दिवस पावसाचा जोर कायम
जिल्ह्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका शेकतकऱ्यांना बसला असून, काढणीसाठी आलेला कापूस, भात आणि केळी पिकाला अवकाळी पाऊस वादळवाऱ्याचा फटका बसला आहे. वेचणीसाठी कापूस तयार होता. मात्र पावसात भिजल्याने तो खराब झाला आहे. तर दुसरीकडे कापणीला आलेला भात आणि कापून ठेवलेला भट दोघेही खराब झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मदत जाहीर करावे असे मागणी शेतकऱ्यांनी केले आहे अजून तीन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.