कानळदा येथे ७ फुटी अजगर आढळला ( पहा व्हिडीओ )

0

जळगाव ;- रविवारी सायंकाळी सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने या वातावरणामुळे हवामानात बदल झालेला पाहायला मिळाला . तालुक्यातील कानळदा गावात रविवारी पावसामुळे ७ फुटी अजगर आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते . यावेळी काहींनी सर्पमित्र ज्ञानेश्वर देशमुख,रितेश भोई आणि ज्ञानेशवर सपकाळे आदींनी ७ फूट असलेला अजगर लीलया पकडला .

त्याला रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जवळच्या जंगलात सुखरूप सोडण्यात आले. दरम्यान अचानक पावसामुळे वातावरणात बदल झाल्याने सरपटणारे प्राणी निघणे हि सामान्य बाब असल्याचे सर्प मित्रानी सांगितले. तसेच वातावरणामुळे आपल्या घराजवळ सर्प निघण्याची शक्यता असून काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.