शहरात आज जोरदार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरासह जिल्ह्यात रविवारी (दि. २६) सकाळपासून ढगाळ, धुकेयुक्त वातावरण होते. सकाळपासूनच वातावरणात गारठा जाणवत असल्याने अनेकांनी स्वेटर, मफलर परिधान केले होते. गाठल्यामुळे जेष्ठानागरिकांना मात्र अंगदुखीचा त्रास सुरु झाला आहे.

संध्याकाळी भुसावळ व जळगावमध्ये माध्यम स्वरूपात पावसाने हजेरी लावली आहे. शहरात सायंकाळी ६.१५ वाजता पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती. दरम्यान, सोमवारी (दि. २७) जिल्ह्यात माध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्ह्यात २४ ते २८ नोव्हेंबरमध्ये बेमोसमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. रविवारी सकाळी काही वेळासाठी सूर्यदर्शन झाले. नंतर दिवसभर ढगाळ वातावरण व हुडहुडी कायम राहिली.

रविवारी रात्री ८ वाजेनंतर विविध ठिकाणी माध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ३० ते ४५ मिलिमीटर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत विविध ठिकाणी पावसाची शक्यता आहे. २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची शक्यता असल्याची माहिती हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.