नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क
महावितरणच्या दुर्लक्षामुळे मागील तीन दिवसांपासून १२ गावांमध्ये अंधार झालेला आहे. या गावांना वीज कनेक्शनने जोडणारे ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला आहे. मात्र महावितरणकडून यात दुरुस्ती किंवा नवीन बसविण्यासाठी कोणतेच पाऊल उचलले जात नाहीये.
आदिवासी गावांमध्ये महावितरणाने टाकलेल्या वीज लाईनवरील ट्रान्सफॉर्मर फेल झाल्याने नंदुरबार जिल्ह्यातील १२ गवे गेल्या तीन दिवसांपासून अंधारात आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा या उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याने एकूण १२ आदिवासी गावांना विजेअभावी अंधाराचा सामना करावा लागत असून, दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत आहे. तर वीज वितरण कंपनी गेल्या तीन दिवसांपासून वीज दुरुस्तीसाठी कोणतेही उपाययोजना न करत आदिवासी गावांकडे दुर्लक्ष करत असल्याने आदिवासी बांधव आता चांगलेच आक्रमक झाले आहे.
रात्रीच्या अंधारात भीती
अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी भाग असलेल्या १२ गावांचा हा परिसर जंगल भागात आहे. यामुळे येथे हिंस्र प्राण्यांचा वावर देखील असतो. यात महावितरणच्या दुर्लक्ष्यामुळे गावांमध्ये अंधार आहे. यामुळे गावात राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.