संतापजनक : मुलाची काढली नग्न धिंड, व्हिडीओ व्हायरल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

आजकाल मुलं देखील सुरक्षित नाहीय. अशीच एक धक्कादायक घटना समोर आलीय.  300 रुपयांसाठी कळव्यातील अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण करून त्याला नग्न केले व बाजारपेठेत फिरवले.  मारहाण करणाऱ्या तौसीफ खानबंदे या आरोपीला अटक केली आहे. तर त्याचा दुसरा साथीदार फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

ठाण्यातील  कळवा येथे एका सोसायटीत राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने तौसीफ खानबंदे याच्याकडून 300 रुपये उसने घेतले होते. या मुलाच्या घरी मंगळवारी तौसीफ हा आपल्या साथीदारासह गेला होता. तौसीफ याने तू माझे पैसे का घेतले, असे विचारत शिवीगाळ केली. त्यानंतर बाचाबाची झाली व तौसीफ याने तू आधी माझे घेतलेले उसने पैसे परत दे, असा तगादा लावला. पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेला तौसीफ व त्याचा साथीदार सामील खानबंदे या दोघांनी मुलाला बेदम मारहाण केली.

https://x.com/andharesushama/status/1727264881370656990?t=AbVOnZQXmhtk7WzIOH17pg&s=08

एवढेच नव्हे तर त्याचे कपडे काढून कळव्याच्या बाजारपेठेतून धिंडही काढली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत असून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर संबंधित घटनेचे व्हिडीओ टाकून सरकारवर टिका केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.