हिंगोली जिल्ह्यातील १० शेतकऱ्यांनी काढले अवयव विक्रीला !

0

किडणी 75 हजार , लिव्हर 90 हजार , डोळे 25 हजार

हिंगोली :- यंदा मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने परिस्थिती गंभीर बनली असून, शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशात खरीप हंगामातील पिकांमध्ये दरवर्षीपेक्षा यंदा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी पैसे कोठून आणायचे, यासाठी किडनी 75 हजार, लिव्हर 90 हजार, डोळे 25 हजारांत विक्री करण्याचा निर्णय जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील दहा शेतकऱ्यांनी काढला असून अवयव विकत घ्यावे अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सोयाबीन व कापूस पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याचे शेतकऱयांनी म्हटले आहे.

अनेक शेतकऱ्यांनी खाजगी, सरकारी बँकेचे कर्ज, सावकारी कर्ज व इतर उसनवारी करून खरीपात पेरण्या केल्या आहेत. मात्र, अपेक्षित पाऊस झालाच नाही.त्यामुळे आमचे अवयव खरेदी करून आमचे बँकेचे कर्ज परतफेड करावे. अशी मागणी या निवेदनात केली आहे. या निवेदनावर गजानन कावरखे, दीपक कावरखे, विजय कावरखे, दशरथ मुळे, संजय मुळे, अशोक कावरखे, रामेश्वर कावरखे, गजानन जाधव, धीरज मापारी, नामदेव पतंगे यांचा यात समावेश आहे.

दरम्यान सरकारकडून शेतकऱ्यांना कुठल्याच योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप होत आहे. तसेच, सोयाबीन, कपाशी आदी पिकांना योग्य भाव दिला जात नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान, सेनगाव तालुक्यातल्या गोरेगाव येथील दहा शेतकऱ्यांनी किडणी 75 हजार रुपये दहा नग, लिव्हर 90 हजार रुपये दहा नग, डोळे 25 हजार रुपये दहा अशा प्रकारे स्वतःचे अवयव विकत घ्या अशी मागणी तहसीलदारामार्फत थेट मुख्यमंत्र्यांना निवेदद्वारे केली आहे.

.

Leave A Reply

Your email address will not be published.