IMDb च्या यादीत शाहरुख खान ठरला सर्वात लोकप्रिय अभिनेता

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

चित्रपट, टीव्ही आणि सेलिब्रिटी जगतातील सर्वात प्रसिद्ध स्रोत असलेल्या IMDb ने २०२३ या वर्षातील टॉप १० सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कलाकारांची घोषणा केली. ही विशिष्ट यादी जगभरातील IMDb च्या २० कोटींहून अधिक व्हिजिटर्सच्या पेज व्ह्यूजवर आधारित आहे. टॉप १० लोकप्रिय कलाकारांच्या यादीत बॉलिवूडच्या ‘किंग खान’ने म्हणजेच शाहरुखने बाजी मारली आहे. पठाण आणि जावं या दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांमुळे जगभरातील चाहत्यांनी त्याला सर्वाधिक पसंती दिली आहे. तर अभिनेत्री आलीय भट्ट या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

IMDb म्हणजेच इंटरनेट मुव्ही डेटाबेस. IMDb हा ऑनलाईन डेटाबेस प्लॅटफॉर्म असून त्यावर चित्रपट पाहणारे रसिकप्रेक्षक आपल्या रेटिंगद्वारे एखाद्या कलाकृतीचा दर्जा ठरवतात. या प्लॅटफॉर्मवर स्टार्स पद्धतीने रेटिंग दिले जातं. १० हे सर्वाधिक रेटिंग असून, चित्रपट, मालिका, वेब सिरीज, व्हिडिओ गेम्स अशा विविध गोष्टींना याठिकाणी रेटिंग दिले जाते. IMDbरेटिंग जेवढे अधिक तेवढा तो चित्रपट, मालिका आणि वेब सिरीज लोकांना भावल्याची पोचपावती असते.

IMDb ची 2023 ची टॉप 10 सर्वांत लोकप्रिय भारतीय कलाकारांची यादी
1- शाहरुख खान 2- आलिया भट्ट 3- दीपिका पादुकोण 4- वामिका गब्बी 5- नयनतारा 6- तमन्ना भाटिया 7- करीना कपूर खान 8- शोभिता धुलिपाला 9- अक्षय कुमार 10- विजय सेतुपती

Leave A Reply

Your email address will not be published.