लोकशाही न्यूज नेटवर्क
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संख्येत वाढ झाली आहे. यामुळे रेल्वे, बससह खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करत असतात. या दरम्यान गर्दीचा फायदा घेत खाजगी ट्रॅव्हल्समधून भाडेवाढ करत लूट केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर नंदुरबार आरटीओकडून ट्रॅव्हल्स एजन्सीची तपासणी सुरु करण्यात आली आहे.
नोकरीनिमित्ताने बाहेर असलेले दिवाळीसाठी घरी येत आहेत. परिणामी रेल्वे. बस व ट्रॅव्हल्सला प्रवांशांची प्रचंड गर्दी होत आहे. बस आणि खाजगी ट्रॅव्हलने अनेक नागरिक प्रवास करत असतात. मात्र खाजगी ट्रॅव्हल प्रवाशांकडून अव्वाचे सव्वा भाडे आकारात प्रवाशांची आर्थिक लूट करत आहे. ही गोष्ट लक्षात घेत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने नंदूरबार आणि शहादा शहरात खाजगी ट्रॅव्हल ऑफिसची तपासणी सुरु केली आहे.
महिनाभर चालेल तपासणी
ट्रॅव्हल्स ऑफिसची तपासणी करत आरटीओने खाजगी ट्रॅव्हल चालकांना तंबी देण्यात आली आहे. सणासुदीला भाडेवाढ केल्यास ट्रॅव्हल चालकांवर कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात आहे. यासोबतच महामंडळाच्या बसेसच्या दीडपट पेक्षा जास्त भाडे न देण्याचे आवाहन करण्यात आले असून, महिनाभर ही तपासणी सुरु राहणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.