लोकशाही न्यूज नेटवर्क
ऐन दिवाळीत राज्यातील काही भागात पावसाची रिमझिम सुरु आहे. राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसात मुंबईसह आजूबाजूच्या भागात चांगलाच पाऊस झाला आहे. त्यानंतर आज शुक्रवारी देखील लोणावळ्यात पाऊस यामुळे दिवाळी खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची एकाच धांदल उडाल्याच पाहायला मिळावं. तर हवामान विभागाने पुढील ४८ तासांत राज्यातील काही भागात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
मुंबईसह ठाणे, अंबरनाथ, बदलापूर या भागात काल पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडीत झाला होता. तर अचानक आलेल्या पावसामुळे रेल्वेचाही वेग मंदावल्याने दिसून आले.
लोणावळ्यात अवकाळी पावसाची हजेरी
दरम्यान, आज शुक्रवारी लोणावळ्यात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने लोणावळ्यात दिवाळी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धांदल उडाली आहे. दिवाळीनिमित्त लोणावळा शहरातील बाजारपेठ सजली आहे. त्यामुळे बाजार गजबजलेला आहे. पण अचानक आलेल्या पावसामुळे बाजारात नागरिकांची धांदल उडाली. तर मावळात दोन दिवसांपासून पाऊस बरसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालं आहे.