पाचोरा ;- तालुक्यातील नगरदेवळा येथील एका २६ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, समाधान ज्ञानेश्वर जाधव (वय – २६) रा. नगरदेवळा ता. पाचोरा हा होतकरु तरुण गावात किराणा दुकानाचा व्यवसाय करुन आपला व आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवत होता. दरम्यान ९ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास नगरदेवळा शेत शिवारात समाधान याचा झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांच्या मदतीने समाधान यास तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी समाधान यास मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक मनोहर पाटील हे करीत आहे. मयत समाधान जाधव याचे पाश्चात्य आई, वडिल, दोन भाऊ, एक बहिण असा परिवार आहे. अतिशय मनमिळाऊ व शांत स्वभावाचा समाधान याने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.