म्यानमार सैनिकांकडून एका गावात एअर स्ट्राईक ; १०० जणांचा मृत्यू

0

बर्मा , लोकशाही न्यूज नेटवर्क
म्यानमार सैन्याकडून चक्क एका गावावर एअर स्ट्राईक केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत लहान मुले, पत्रकारांसह तब्बल १०० लोकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या गावात म्यानमारच्या विरोधी गटाच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात नागरिक सहभागी झाले होते.

म्यानमार मध्ये घडलेल्या घटनेने संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, म्यानमार सैन्याच्या फायटर जेटने मंगळवारी सकाळी ८ वाजता तब्ब्ल १५० लोकांच्या जमावावर बॉम्ब टाकला. या हल्ल्यात जवळपास १०० लोकांचा मृत्यू झाला.

बॉम्ब हल्ल्यात तब्बल १०० लोकांचा जागीच मृत्यू झाला तर मृतांमध्ये सरकारविरोधी गटाच्या स्थानिक नेत्यांसह सामान्य महिला नागरिक आणि २०-३० लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

एअर स्ट्राईकनंतर एक दीड तासाने एका हेलिकॉप्टरने गोळीबार केला. म्यानमार सरकारने या हल्ल्याचे वार्तांकन करण्यास मनाई केल्याने या हल्ल्यात मृतांचा आकडा समोर आला नाही.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.