डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप ओरिएन्टेशन प्रोग्रॅम उत्साहात

0

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क

नुकताच वैद्यकीय महाविद्यालयातील अंतिम वर्षाचा निकाल लागला असून डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सोमवार दि.१० एप्रिल रोजी इंटर्नशिप ओरिएन्टेशन प्रोग्रॅम घेण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील, अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, मेडिकल सुपरिटेडेंट डॉ.प्रेमचंद पंडित, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, डॉ.निलेश बेंडाळे, डॉ.ढेकळे, श्री विजय मोरे यांची उपस्थीती होती. मान्यवरांच्याहस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करुन आता प्रत्यक्षात रुग्णसेवेस सुरुवात करतांना आपले वर्तन कसे असावे, रुग्णाप्रती आपल्या भावना काय असाव्यात यासंदर्भात मार्गदर्शन केले तसेच शपथ ही देण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्‍त केले. प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड यांनी आपल्या मुलीच्या जन्मापासून ते आतापर्यंतचा तिचा डॉक्टर बनण्यापर्यंतचा प्रवास सांगतांना ते भावूक झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.निलेश बेंडाळे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.