मनसे पदाधिकाऱ्यांची दबंगगिरी; महिलेला मारहाण (व्हिडीओ)

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मनसे (Maharashtra Navnirman Sena) पदाधिकाऱ्यांच्या दबंगगिरीचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. मुंबादेवी (Mumbadevi) परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरुन एका महिलेला मारहाण करण्यात आली. मारहाण करणारा व्यक्ती मनसेचा (MNS) उपविभाग प्रमुख असून त्याचं नाव विनोद अरगिले (Vinod Argile) असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी महिलेनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे.

प्रकाश देवी यांचे मुंबादेवी परिसरात मेडिकल स्टोअर आहे. या मेडिकल स्टोअरच्या समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकारी विनोद अरगिले व त्यांचे साथीदार जाहिरातीसाठी लाकडी खांब लावत होते. प्रकाश देवी यांच्या मेडिकलसमोर एक खांब उभारत असतांना महिलेने त्यांना विरोध केला. त्यानंतर महिलेला मारहाण करण्यात आली.

या व्हायरल व्हिडिओमध्ये विभाग प्रमुख विनोद अरगिले हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी महिलेला मारताना दिसत आहेत. महिलेला धक्काबुक्कीही करण्यात आली.

दरम्यान पीडित महिलेने आरोप केला आहे की, विनोद अरगिले याने आपल्याला केवळ मारहाणच केली नाही तर तिच्यासोबत असलेल्या लोकांनीही शिवीगाळ केली.

Leave A Reply

Your email address will not be published.