पाळधी येथे जीपीएस परिवारातर्फे बाप्पाचे जल्लोषात स्वागत…

0

 

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क;

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ, पाळधी संचलित. जीपीएस परिवारातर्फे गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत व स्थापना करण्यात आली. माध्यमिक विद्यालयाच्या कला शिक्षिका के. टी. वाघोदे व त्यांचे पती सुनील महाजन यांच्या हस्ते गणेशाची विधिवत पूजन व स्थापना करण्यात आली.

याप्रसंगी संस्थेचे आधारस्तंभ स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री. गुलाबराव पाटील, संस्थेचे अध्यक्ष प्रताप पाटील, संस्थेचे सचिव विक्रम पाटील. यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान जीपीएस परिवारातील तीनही विभागाचे प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बाप्पाच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.