धावत्या रेल्वेखाली प्रौढाची आत्महत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पाचोरा शिरसोली दरम्यान दापोरा शिरसोली रेल्वे गेट जवळ धावत्या रेल्वेखाली ४५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस  आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शेख इरफान शेख याकुब मनियार (वय ४५, रा. हाजी अहमद नगर, सलार नगर जवळ, जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शेख इरफान शेख याकुब मानिवार हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह राहतात. बांगड्यांचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्याचे सराफ बाजारातील भवानी माता मंदीराजवळ दुकान लावू बांगडयांचा व्यवसाय करत होते. त्यांची पत्नी रूखसानाबी या मुजाहिद व जयद या दोन मुलांसह नंदूरबार माहेरी कामानिमित्त दोन दिवसांपासून गेलेल्या होत्या. त्यामुळे शेख इरफान हे घरी एकटेच होते.

गुरुवार १ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता ते दुचाकीने शिरसोली येथील मोठी बहिण मलेकाबी यांच्याकडे गेले. शिरसोली रेल्वे स्थानकाजवळ त्यांनी दुचाकी लावून धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे सकाळी ९ वाजता उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.

दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला व मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.