भुसावळ : रेल्वे गाड्यांना प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून गर्दी कमी करण्यासाठी मुंबई ते गोरखपूर या मार्गावर विशेष रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भुसावळ विभागातील प्रवाशांना मुंबईत जाण्यासाठी मोठी सोय होणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष 01085 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते गोरखपूर ही गाडी बुधवार, 17 एप्रिल रोजी रात्री 11.50 वाजता सुटेल आणि तिसर्या दिवशी सकाळी 9.30 वाजता गोरखपूर येथे पोहोचणार आहे. गोरखपूर येथून विशेष गाडी 01086 ही शुक्रवार, 19 एप्रिलला दुपारी 3.30 वाजता सुटेल आणि तिसर्या दिवशी एलटीटीला पोहोचणार आहे. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा आणि बस्ती येथे थांबणार आहे. या गाडीला 16 डबे असतील. प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.