जैताणे येथे श्री रामकथा अमृतोत्सवाला उत्साहात प्रारंभ

0

निजामपूर ता. साक्री (वार्ताहर ) ;-तालुक्यातील जैताणे येथे संजय नगर परिसरात 17 एप्रिल पासुन राम नवमीच्या पावन शुभ दिना निमित्त श्री रामकथा अमृतोत्सव भक्तीमय व शक्तीमय वातावरणातुन प्रारंभ झाला.या सात दिवशीय श्री राम कथा कार्यक्रमातून सर्व दलीय गोरक्षा राष्ट्रीय मंच सयोजक भागवताचार्य प.पू.श्रद्धेय महेंन्द्र कृष्ण शास्त्री यांच्या मधुर वाणीतून श्री राम कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या भक्तीरस श्री राम कथेचा जैताणे निजामपूर सह माळमाथा परिसरातील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आयोजक शिवपुराण समिती संजय नगर,द्वारकाधीश मित्र मंडळ,जयभद्रा मित्र Self ग्रामस्त संजय नगर येथे तीन वर्षा पासून अखंडित श्री राम अमृतोत्सव यासात दिवशीय कार्यक्रमाचे जैताणे येथील संजय नगर परिसरात आयोजक समीती तर्फे काल रोजी बुधवार दि.17 सात दिवशीय कार्यक्रमाला प्रारंभ झाला असुन दि.18 रोजी राम नवमीच्या पहिल्या दिवशी कलश यात्रा शोभा,गावातून काढण्यात आली.जैताणे येथील श्रीराम कथा कार्यक्रमातून भागवताचार्य प.पू.श्रद्धेय महेंन्द्र कृष्ण शास्त्री भक्तीरस वाणीतून दि.17 बुधवार 24 बुधवार या सात दिवशीय कालावधीत रोजी सायंकाळी 7:30 ते 11:30 या कालावधीत कथेस प्रारंभ होतो.

मंगला चरण एव सती चरीत्र,श्री राम प्राकटय उत्सव,वाल लिला,अहिल्या उध्दार एवं जनकपूर दर्शन,पुष्पवाटिका प्रंसग,श्रीराम विवाह,श्री वनवास,केवट प्रंसग,भरत चरित्र,श्रीराम राज्यअभिषेक, विशाल भंडारा, भागवताचार्य कथा सादर करणार भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा या कार्यक्रमाला भागवत सेवा समीती, तसेच भातोजी महाराज सेवा समीती,संत सावता भंजनी मंडळ, राजमाता अहिल्यादेवी भंजनी मंडळ,जयभद्रा मित्र मंडळ,व जैताणे संजय नगर ग्रामस्था चे सहकार्य लाभत आहे असे आयोजक शिवपुराण समीती यांनी सागितले.

Leave A Reply

Your email address will not be published.