मुंबई,प्रयागराज आणि पुणे येथून २२ उन्हाळी विशेष गाड्या

0

मुंबई ;- उन्हाळी हंगामात प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून, मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) आणि सूबेदार गंज (प्रयागराज) आणि पुणे ते वीरांगना लक्ष्मीबाई झांसी दरम्यान २२ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस – सूबेदार गंज साप्ताहिक विशेष (२२ फेऱ्या)

04116 साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. १९.०४.२०२४ ते २८.०६.२०२४ पर्यंत दर शुक्रवारी २०.१५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०५.१० वाजता सुभेदारगंज येथे पोहोचेल. (११ फेऱ्या)

04115 साप्ताहिक विशेष सुभेदारगंज येथून दि. १८.०४.२०२४ ते २७.०६.२०२४ पर्यंत दर गुरुवारी सकाळी ११.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १६.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (११ फेऱ्या)

थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, चित्रकूट धाम, बांदा, रागौल, भरवा सुमेरपुर, कानपूर सेंट्रल आणि फतेहपुर.

संरचना: २ वातानुकूलित-द्वितीय, ७ वातानुकूलित-तृतीय इकॉनॉमी, ६ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन. (२१ डब्बे)

पुणे ते वीरांगना लक्ष्मीबाई झांसी साप्ताहिक विशेष (२२ फेऱ्या)
01923 साप्ताहिक पुणे येथून दि. २१.०४.२०२४ ते ३०.०६.२०२४ पर्यंत दर रविवारी १६.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १३.०० वाजता वीरांगना लक्ष्मीबाई झांसी येथे पोहोचेल. (११ फेऱ्या)

01924 साप्ताहिक वीरांगना लक्ष्मीबाई झांसी येथून दि. २०.०४.२०२४ ते २९.०६.२०२४ पर्यंत दर शनिवारी १२.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पुणे येथे पोहोचेल. (११ फेऱ्या)

येथे मिळणार थांबा

दौंड कॉडलाईन, अहमदनगर,कोपरगाव,मनमाड, भुसावळ,खंडवा,इटारसी,नर्मदापुरम,भोपाल,विदिशा,बिना आणि ललितपुर

१ वातानुकूलित-द्वितीय, ५ वातानुकूलित-तृतीय , ५ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी यासह २ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन. (१७ डब्बे) आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक 04116, 01924 साठी विशेष शुल्कावर बुकिंग दि.१८.०४.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल. विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.