अर्थमंत्र्यांच्या विधानामुळे खळबळ; “मुंबई सारखं नाही! बेंगळुरूमधील उद्योजक खूप सभ्य अन् शांत”

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

२६ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत स्टार्टअप कंपन्यांच्या प्रतिनिधींशी, विशेषतः फिनतेक कंपन्यांशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संवाद साधला. सर्व कंपन्यांशी त्यांच्या समस्या सांगितल्या, असे अर्थमंत्यानी सांगितले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की फिनटेक क्षेत्रातील काही स्टार्टअपची समस्यांना संपूर्ण क्षेत्राची समस्या म्हणून पाहिले जाऊ नये. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सीतारामन म्हणाल्या की, सरकार पूर्णपणे स्टार्टअपच्या पाठीशी उभे आहे आणि या कंपन्यांना शक्य ती सर्व मदत केली जाईल.

सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अनेक फिनटेक आणि नॉन-फिनटेक उद्योजक सहभागी झाले होते. सुमारे एक महिन्यापूर्वी, रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडवर अनेक निर्बंध लादण्याची घोषणा केली होती. फिनटेक नियमांच्या समस्यांमुळे मध्यवर्ती बँकेने हे निर्बंध जाहीर केले होते.

यानंतर स्टार्टअप्सच्या संस्थापकांचा एका समूहाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सीतारामन आणि रिझर्व्ह बँकेला पत्र लिहून पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडवर लादलेल्या निर्बंधांचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.

सीतारामन म्हणाल्या की, ‘मला या क्षेत्राबद्दल पूर्ण सहानुभूती आहे आणि एक, दोन किंवा चार स्टार्टअपच्या समस्या आहेत याचा अर्थ संपूर्ण स्टार्टअप जगाची ती समस्या आहे म्हणून पाहिले जाऊ नये. असे अनेक स्टार्टअप चांगले काम करत आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिल्ली आणि मुंबईतील उद्योजकांच्या तुलनेत बेंगळुरूमधील उद्योजक खूप सभ्य आणि शांत वाटतात. द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना त्या म्हणाल्या की बेंगळुरूमधील उद्योजक फक्त सोशल मीडियावर सरकारसाठी कठोर शब्द वापरतात.

Leave A Reply

Your email address will not be published.