संतापजनक; पोटच्या लेकींना सोडून आई प्रियकरासोबत तर बाप प्रियसीसोबत फरार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर मधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. ३ मुलींना सोडून आई प्रियकरासह, तर वडील प्रियसीला घेऊन प्रसार झाल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधल्या सातारा परिसरात घडली आहे. आई-वडील सोडून गेल्याने तिन्ही मुली गेल्या अडीच महिन्यांसासून माय-बापाची वाट पाहत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातील सातारा परिसरात एक जोडपे भाड्याने राहत होते. त्यांना तीन मुली असूनही पती- पत्नी दोघांचेही विवाहबाह्य संबंध सुरू होते. मात्र दोघेही एक दिवस घर सोडून आपापल्या प्रियकर आणि प्रेयसीकडे गेले.

त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून आई-वडिलांच्या प्रतीक्षेत असलेले या लहान मुलींचे अश्रू अजूनही थांबत नाहीत. त्यांच्या घरमालक आणि समाजसेवकांनी या मुलींचा सांभाळ केला. त्यानंतर बालकल्याण समितीला ही माहिती कळताच सातारा पोलीस ठाण्यात दोन्ही आई-वडिलांना विरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

या दोघांचेही मुलींकडे अनेकदा दुर्लक्ष असायचे. शिवाय नाहक मारहाण देखील माय-बाप या मुलींना करायचे. आय डिसेंबर महिन्यापासून बेपत्ता झालेले मायबाप कधी परत येथील याची प्रतीक्षा अजूनही या तीन लहान मुली करत आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणांमध्ये सातारा पोलीस अधिक तपास करत आहे. सध्या या मुली बालकल्याण समितीच्या आदेशाने छावणीच्या बालगृहात वास्तव्य करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.