गावठी पिस्तुलासह अण्णा च्या मुसक्या आवळल्या

0

जळगाव : शहरातील अजिंठा चौफुलीजवळील भुसावळरोडरील रोडवर गावठी कट्ठयाासह जिवंत काडतूस घेवून दहशत माजविणारा सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार अर्शद शेख हनिफ उर्फ अन्ना (वय २६, रा. गेंदालाल मिल) याच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

त्याच्याकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील अजिंठा चौफुलीवरील भुसावळ रोडवर असलेल्या रस्त्यावर अर्शद शेख हनिफ उर्फ अन्ना हा विना परवाना गावठी कट्टा घेवून फिरताना आढळून आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.