मुंबईत भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबईच्या दहिसर पूर्वेकडील आनंद नगर लिंक रोड पुलावर लक्झरी बस आणि कारचा भयंकर अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दहिसर परिसरातील आनंद लिंक रोड पुलावर गुरुवारी (२१ डिसेंबर) भीषण अपघाताची घटना घडली. लक्झरी बस आणि भरधाव कारमध्ये हा भीषण अपघात झाला. या अपघाताची दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झालेत.

रोहन बंगेरा असे या जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याला दहिसर येथील नवनीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचा सध्या शोध सुरु आहे. दहिसर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. शाळकरी मुलांच्या बसचा अपघात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन शेक्षणिक सहलीला निघालेल्या बसचा भीषण अपघात झाला. वेगात असलेल्या एसटी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर ट्रकला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक शिक्षक गंभीर जखमी झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.