कपडे बदलवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील पिंप्राळा भागातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. कपडे बदलत असतांना तरुणीचा  बनावट व्हिडीओ तयार करुन तो व्हायरल करण्याची धमकी देणा-या इंस्टाग्राम खाते धारक तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील पिंप्राळा येथे राहणाऱ्या फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. इंस्टाग्राम खाते धारक तरुणाने या तरुणीला व्हिडीओ पाठवून व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. सदर प्रकार द्वेष भावनेतून झाला असल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.