मुंबईत ‘या’ भागात शनिवार-रविवार दरम्यान मेगाब्लॉक

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मध्यरेल्वेच्या उल्हासनगर स्थानकाजवळ पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी कल्याण ते अंबरनाथ स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर विशेष रात्रीचा वाहतूक ब्लॉक शनिवार-रविवार मध्य रात्री १.२० वाजेपासून ते ३.२० वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल सेवांच्या वेळात बदल करण्यात येणार आहे.

सीएसएमटी येथून रात्री ११.५१ वाजता अंबरनाथसाठी सुटणारी लोकल आणि अंबरनाथ येथून रात्री १०.०१ आणि १०.१५ वाजता सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या लोकल रद्द राहतील. सीएसएमटी येथून मध्य रात्री १२.०४ वाजता अंबरनाथसाठी सुटणारी लोकल कुर्ला येथे टर्मिनेट करण्यात येईल. सीएसएमटी येथून रात्री १२.२४ वाजता कर्जतसाठी सुटणारी लोकल ठाणे स्थानकापर्यंत चालविण्यात येईल. कर्जत येथून रात्री २.३३ वाजता सीएसएमटीसाठी सुटणारी लोकल ठाणे येथून पहाटे ४.०४ वाजता सुटेल.

ब्लॉकपूर्वीची सीएसएमटी येथून कर्जतला शेवटची लोकल सीएसएमटी येथून रात्री ११.३० वाजता सुटेल. खोपोली येथून सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल, खोपोली येथून १०.१५ वाजता सुटेल. सीएसएमटी येथून ब्लॉकनंतर कर्जतकरीत पहिली लोकल सीएसएमटी येथून पहाटे ४.४७ वाजता सुटेल. कर्जत येथून सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल कर्जत येथून पहाटे ०३.४० वाजता सुटेल. ब्लॉक कालावधीत कल्याण आणि अंबरनाथ स्थानकांदरम्यान सर्व अप आणि डाऊन सेवा रद्द राहतील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.