मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबईतील घाटकोपर येथील राजावाडी कॉलनीमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला आहे. घाटकोपर राजेवाडी रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या दोन मजली बंगल्याचा काही भाग कोसला आहे. यात एक वृद्ध महिला आणि एक पुरुष ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिटलं आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. बचावकार्य सुरु असून, आत्तापर्यंत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.