लोकशाही न्यूज नेटवर्क
ओडिशातील रेल्वे अपघाताच्या आठवणी ताज्या असतांनाच त्याच अपघाताची बंगालमध्ये पुनरावृत्ती झाली आहे. पण, यावेळी दोन्ही मालगाड्या असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समोर आलं आहे. ओडिशातील अपघाला महिना पूर्ण होत नाही तोच तसाच दुसरा अपघात झाल्याने रेल्वे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पश्चिम बंगालमध्ये बांकुडा रेल्वे स्थानकावर दोन मालगाड्या एकमेकांवर जोरदार आदळल्या. नंतर बरचसे डबे रुळावरून घसरले. हा अपघात आज रवी वारी पहाटे ४ वाजता ओंड स्टेशनवर झाला. यामध्ये एका मालगाडीच्या चालकाला जखमा झाल्या आहे. पाठीमागून टक्कर दिल्याने मालगाडीचे १२ डब्बे घसरल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.