भडगावात आषाढीला बकरी ईदची कुर्बानी नाही ; शांतता कमेटीच्या बैठकीत निर्णय

0

 

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

दि.२९ गुरुवार रोजी आषाढी एकादशी आहे. त्याच दिवशी बकरी ईद येत असल्याने या रोजी कोणत्याही प्रकारची कुर्बानी देण्यात येणार नसल्याचा निर्णय काल झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत येथील मुस्लीम बांधवांनी घेतला आहे.

येणारी आषाढी एकादशी तसेच बकरी ईद सणाच्या अनुषंगाने भडगाव तहसिल कार्यालय येथे तहसिलदार यांचे दालनात तहसिलदार मुकेश हिवाळे यांचे अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर मिटिंग कामी तहसिलदार मुकेश हिवाळे, मुख्याधिकारी रविंद्र लांडे, पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.निर्मल असे तसेच शांतता कमिटीचे सर्व सदस्य पदाधिकारी हजर होते. याप्रसंगी विजय देशपांडे, गणेश परदेशी, जाकिर हाजी कुरेशी, सुनिल पाटील सर, इम्रान अली सैय्यद, डॉ. निलेश पाटील, ज्येष्ठ पत्रकार शिवदास महाजन यांनी त्यांचे मत मांडले.

दरम्यान, आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने शहरातील मुस्लिम समाजाने या दिवशी कुर्बानी देण्यात येवु नये बाबत उपस्थित मुस्लिम बांधवांना सुचविण्यात आले होते. त्यावरुन मिटिंगसाठी उपस्थित जाकिरखान यासिनखान कुरेशी, इम्रान अली सैय्यद यांनी आम्ही सायंकाळी मुस्लिम समाजाची मिटिंग घेवुन बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत जाहीर केला.

भडगांव शहरातील मुस्लिम बांधवांच्या जातीय सलोखा जोपासण्याच्या या निर्णयावरुन सर्वत्र कौतुक होत आहे. दोन्ही सणाच्या पार्शभुमिवर भडगांव पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता अबाधित रहावी करिता तहसिलदार भडगांव यांचे दालनात सर्व सदस्यिय शांतता कमिटी पदाधिकारी, अधिकारी यांचे भडगांव पोलीस स्टेशनचे गोपनिय अंमलदार पो.हे.कॉ विलास पाटील, पो काँ. स्वप्निल चव्हान यांनी आयोजन केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.